About

Gagangiri Maharaj: A Beacon of Devotion and Spiritual Wisdom

इतिहास

प्राचीन काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्त्व होते. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि काही वेळा तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी सहयाद्री मध्ये ठराविक ठिकाणी दुर्ग बांधणी केली गेली. अश्याचप्रकारे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणारा एक प्रमुख घाट म्हणजे करूळ/ गगनबावडा घाट आणि यावर लक्ष ठेऊन असलेला दुर्ग गगनगड..... वेड्यावाकड्या वळणांचा सुंदर घाट आणि बाजूलाच डोंगरावर गगनगिरी महाराजांचा आश्रम असलेला गगनगड खूप मनमोहक ठिकाण सांभाळून आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात होता. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. गगनगड उभारणीचा मान शिलाहार काळातील शेवटचा राजा दुसरा भोज याच्याकडे जातो. ज्याच्या कारकिर्दीत भरपूर आणि सुंदर देवालय आणि लेणी बांधली गेली होती. नशीबवान महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. आणि त्याच संतांच्या पदस्पर्शाने आणि नांतर शिवरायांच्या पदकमलाने सह्याद्रीतील दुर्ग धन्य झालेत. तपस्येच्या काळात बर्‍याच संतानी गिरीशिखरांचा आश्रय घेतला.योग साधनेने चौदाशे वर्ष जगलेले योगी चांगदेवायांनी हरिश्चंद्रगडावर तप केले, संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते, गोरखनाथांनी गोरखगडावर तप केले, संत तुकारामांनी भंडारा डोंगरावर तप केले, तर रामदासांच्या निरनिराळ्या रहस्यमय घळी ठीक ठिकाणी प्रसिध्द आहेतच, त्यांचे सुद्धा वास्तव्य सह्यद्रीतील सज्जनगडावर होते. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातल्या मणदुरे गावातील श्रीपाद पाटणकर म्हणजेच गगनगिरी महाराज यांनी या गडावर तप साधना केली होती. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मुळ स्थान असून सर्वोच माथ्यावर त्यांचे मंदिर आहे. गगनगिरी महाराजांमुळेच गडाला गगनगड असे संबोधतात. पण मूळ नाव श्रीपाद पाटणकर असलेले, तळ कोकणा पासून गगनाला गवसनी घालणाऱ्या या गडावरील दीर्घ काळच्या वास्तव्य मुळे त्यांना गगनगिरी महाराज नावाने संबोधले गेले. गगनगड सह्याद्री पठाराच्या टोकावर असल्यामुळे त्याच्या पश्चिमेकडे कोकणात उतरणार्‍या खोल दर्‍या आणि डोंगर सोंडी डोळे दिपवून टाकतात.

The Life of Gagangiri Maharaj

Born in the 19th century in a small village, Gagangiri Maharaj's life was destined to be one of deep spiritual transformation. From a young age, he exhibited extraordinary qualities of compassion, wisdom, and devotion. He devoted his life to the teachings of ancient scriptures and focused on spreading the importance of self-realization, prayer, and service to the underprivileged. As a spiritual teacher, Maharaj was known for his ability to communicate profound spiritual truths in simple, accessible ways. His approach combined deep philosophical insights with practical methods for spiritual growth, making his guidance both timeless and practical for everyday life.

The NATURE